आपल्या सेवेस सदैव तत्पर

ग्रामपंचायत रुईखैरी

स्थानिक विकास, स्वच्छता आणि नागरिक कल्याण यासाठी कटिबद्ध.

स्वच्छता व पाणीपुरवठा

गावातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची देखभाल व वितरण सेवा.

नागरिक सुविधा

जन्म, मृत्यू दाखले, कर भरणा, आणि ग्रामसेवक कार्यालयीन मदत.

विकास व पर्यावरण

रस्ते, झाडे, पाणी साठवण व ग्रामविकास प्रकल्पांची अंमलबजावणी.

ग्रामपंचायत
रुईखैरी
Rui Khairi Gram Panchayat

ग्रामपंचायत रुईखैरी

आमच्याबद्दल माहिती

रुईखैरी हे गाव महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात वसलेले आहे. हे गाव तालुका मुख्यालय नागपूरपासून सुमारे 30 किमी आणि जिल्हा मुख्यालयापासून देखील 30 किमी अंतरावर आहे.

रुईखैरी ही स्वतःची स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. येथे लोकसंख्या, साक्षरता, घरकुल, मुलं, जातीवर्ग, क्षेत्रफळ, तसेच स्थानिक प्रशासनाची माहिती उपलब्ध आहे. ग्रामपंचायत रुईखैरी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे — पाणीपुरवठा, रस्ते बांधकाम, स्वच्छता, कर वसुली आणि सामाजिक उपक्रम यांसाठी विविध योजना राबविल्या जातात.
30किमी
नागपूरपासून
1962
स्थापना वर्ष
100%
विकासासाठी बांधिल
संपर्क साधा

ग्रामपंचायत रुईखैरी टीम

ग्रामपंचायत रुईखैरीचा विकास आणि नागरिकांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असलेली आमची कार्यसंघ.

Sarpanch

सौ. सारिका बखाल

पद : ग्रामपंचायत अधिकारी

Gramsevak

श्री. इंद्रजीत ढोकणे

पद :प्रशासक

Rui Khairi Gram Panchayat

माझी वसुंधरा अभियान

आपली हिरवी पहल

“माझी वसुंधरा अभियान” हे महाराष्ट्र शासनाचे एक अभिनव उपक्रम आहे, ज्यामध्ये पर्यावरणाचे रक्षण, संवर्धन आणि शाश्वत विकास साधणे हा उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण, जलसंवर्धन, ऊर्जा बचत, कचरा व्यवस्थापन आणि जैवविविधतेचे संवर्धन या पाच घटकांवर भर दिला जातो.

ग्रामपंचायत रुईखैरी यांनी देखील या अभियानामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने स्वच्छ आणि हरित ग्राम निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत जसे की स्वच्छता मोहीम, प्लास्टिक मुक्त उपक्रम, आणि जलसंधारण प्रकल्प.

अधिक जाणून घ्या

ग्रामपंचायत रुईखैरी
संक्षिप्त माहिती

गावाची लोकसंख्या, पाणीपुरवठा व कर्मचारी माहिती

📊 लोकसंख्या माहिती

विवरण स्त्री पुरुष
लोकसंख्या 1481 1336
इतर मागासवर्ग 850 1260
एस.सी. 95 155
एस.टी. 175 282

🚰 पाणी पुरवठा व्यवस्था

  • १) एकूण कुटुंब संख्या : 494
  • २) नळ कनेक्शन : 494
  • ३) हातपंप संख्या : 9
  • ४) सार्वजनिक विहीर : 2
  • ५) खासगी विहीर : 9
  • ६) पाणी टाकी : 1

👨‍💼 ग्रामपंचायत कर्मचारी माहिती

  • १) ग्रामपंचायत कर्मचारी : श्री. दिगेश कळसर्पे, श्री. गिरजा करकुरे
  • २) पाणी पुरवठा कर्मचारी : जयश्री ठाकरे, जगदीश कुंभरे
  • ३) कचरा उठाव कर्मचारी : ज्ञानेश्वर चव्हाण, रविद्रास लष्करे
  • ४) नाली सफाई कर्मचारी : शांताबाई मिरेकर, रामुबाई लष्करे, पूजा झाकणकर
  • ५) ग्रामपंचायत ऑपरेटर : मोहन सोनोने

छायाचित्र संग्रह

रुईखैरी ग्रामपंचायतीतील विविध उपक्रम व कार्यक्रम

अंगणवाडी व जि. प. प्राथमिक शाळा

विकास कामे

रस्ता काँक्रिटीकरण काम

वनराई बंधारा

सीसीटीव्ही कॅमेरा

स्वच्छता अभियान

पाणी वाचवा प्रतिज्ञा

द्वीप प्रज्वलन

हँड पम्प

ग्रीन जिम

ग्राम पंचायात ऑफिस

सचिव कक्ष

मीटिंग हॉल

स्मशान भूमी

तक्रार पेटी